Share

ENG vs IND : केएल राहुलचं नशीबच फुटकं! आधी आफ्रिकेविरुद्ध खेळता आलं नाही आणि आता…

Published On: 

मुंबई : इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वीच (ENG vs IND) भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आघाडीचा सलामीवीर केएल राहुल मांडीच्या दुखापतीमुळे संपूर्ण दौऱ्यातून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याला उपचारासाठी परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्याला जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघ एक कसोटी आणि सहा मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू होण्याच्या एक दिवस आधी केएल राहुलला दुखापत झाली आणि तो मालिकेतून बाहेर पडला. तेव्हा त्याची दुखापत फारशी गंभीर नसून तो भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाईल अशी अपेक्षा होती, पण आता तो एकाही सामन्याचा भाग असणार नाही.

क्रिकबझशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ”बोर्ड राहुलच्या फिटनेसवर काम करत आहे. या महिन्याच्या अखेरीस राहुल पुन्हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी जर्मनीला रवाना होईल.” इंग्लंड दौऱ्यासाठी केएल राहुलला उपकर्णधार बनवण्यात आले होते पण आता बीसीसीआय ही जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे सोपवणार आहे.

१ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी गुरुवारी सकाळी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. त्याचे काही फोटो बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरही शेअर केले आहेत. विराट कोहली, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडू फोटोंमध्ये दिसत आहेत. भारतीय संघ २४ ते २७ जून दरम्यान लीसेस्टरशायर विरुद्ध एक सराव सामनाही खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!