Share

विधानपरिषद निवडणुकीत भाजपला फटका बसणार? दोन आमदार राष्ट्रवादीला मतदान करण्याची शक्यता!

Published On: 

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवून पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपने महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आश्चर्यचकीत धक्का देत आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता. यानंतर आता विधानपरिषेदेच्या निवडणूक तोंडावर आहेत.आता विधान परिषद निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीला धक्का देणार का ? याची चर्चा होत आहे.

मात्र आता भाजपालाच विधान परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे. एकेकाळचे भाजपाचे मातब्बर नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषेदेला उमेदवारी मिळालेले एकनाथ खडसे यांना भाजपाच्या दोन आमदारांची मतं मिळतील अशी शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदार संजय सावकारे आणि सुरेश भोळे या भाजपच्या दोन आमदारांची मते एकनाथ खडसे यांना मिळण्याची शक्यता आहे.

एकेकाळी महाराष्ट्र भाजपाचे मातब्बर नेते असलेल्या एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंतर्गत विरोध झाला होता. शेवटी काही काळाने खडसेंनी भाजपाला रामराम ठोकला. यानंतर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसने खडसेंना विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग भाजपामध्ये आहेत. काही आमदार हे खडसे समर्थक आहेत. भाजपचे दोन आमदार विधान परिषद निवडणुकीत मतदान हे गोपनीय असल्याने खडसेंना मतदान करतील, असा अंदाज आहेत. यामध्ये संजय सावकारे आणि सुरेश भोळे यांची नावं घेतली जात आहेत. यापूर्वी संजय सावकारे यांच्या बॅनरवर एकनाथ खडसेंचा फोटो दिसून आला होता. त्यामुळे आता भाजपला झटका बसणार अशी चर्चा सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!