Share

कोरोनाबाधित आमदार आंदोलनात, नागपूर मनपाने बजावली नोटीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: सध्या कोरोना झपाट्याने पसरत असल्याने राज्यभरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र हे नियम फक्त सामान्य नागरिकांना असल्याचे दिसते. कारण कोरोनाबाधित आमदार थेट आंदोलनात सहभागी झाला असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे (BJP MLA Krishna Khopde) यांना नागपूर महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोरोनाबाधित असताना गृह विलगीकरणाचे नियम मोडले म्हणून ही नोटीस बजावली. कोविड नियम तोडले म्हणून कारवाई का करण्यात येऊ नये, असे या नोटिसीत म्हटले आहे. तसेच चोवीस तासांत उत्तर सादर करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांनी आमदार खोपडे यांना दिले आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनी मनपाला नोटिसीचं उत्तर दिलं.

आमदार कृष्णा खोपडे यांनी मी पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर टाकले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी ते घराबाहेर पडले. नाना पटोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. त्या आंदोलनात आमदार खोपडे सहभागी झाले होते. मी पॉझिटिव्ह असलो तरी कोणत्याही प्रकारची लक्षणं नव्हती. सर्दी, खोकला, ताप काहीच नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मी घराबाहेर पडलो. त्यामुळं नोटिसीवर फेरविचार करून निर्णय घ्यावा, अशी विनंती खोपडे यांनी मनपाला केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!