Share

मी सलमानच्या पाठीवरील माकड होऊ शकत नाही – झरीन खान

Published On: 

मुंबई : बॉलिवूड (Bollywood ) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan)  ‘वीर’ (Veer) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खानला (Zareen Khan) सर्वपरिचित आहे. मात्र सध्या ती सक्रिय नसली तरी तिच्या स्पष्टपणे मत मांडत असते. नुकतंच झरीनने एका मुलाखतीत सलमान खान आणि तिच्या नात्याबद्दलचा (relationship) मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर झरीन खानचा प्रवास फार खडतर होता. ‘वीर’ चित्रपट फ्लॉप झाल्यानतंरही सलमान खान हा नेहमी झरीनला मदत करतो, अशी चर्चा कायम बॉलीवूडमध्ये असते. मात्र या सर्व चर्चांवर झरीन खानने स्पष्ट शब्दात उत्तर दिले. झरीन खानने नुकतंच एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या सिनेसृष्टीतील करिअरबद्दलही खुलासा केला आहे.

https://www.instagram.com/reel/CY03qZAFgmW/?utm_source=ig_web_copy_link

पुढे झरीन खान म्हणाली, “चित्रपटसृष्टीतील माझ्या जागेवर मी नेहमीच खूप समाधानी आहे. यामुळे मी कधीही कोणत्याही शर्यतीचा भाग बनली नाही. मात्र आता मी खूप बदलली आहे. कारण तुम्ही ए-लिस्टर असल्याशिवाय लोक तुमची वाट पाहत नाहीत, हे मला समजलं आहे.” तसेच सलमान खानबद्दल बोलतांना म्हणाली “अजूनही अनेकांच्या मनात असा समज आहे की सलमान खान मला मदत करत आहे. सलमान खानने मला सिनेसृष्टीत येण्याची संधी दिली. मात्र जेव्हा मी सिनेसृष्टीचा भाग बनले, तेव्हा खऱ्या अर्थाने माझा संघर्ष सुरु झाला. त्यावेळी मला काहीही माहिती नव्हते.”

https://www.instagram.com/p/CVz9GU0MJHS/?utm_source=ig_web_copy_link

“सलमान खान हा एक अद्भुत व्यक्ती आहे. पण तो फार व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी सलमान आणि त्याच्या भावांच्या पाठीवरील माकड (monkey) होऊ शकत नाही. सलमान हा मित्र आहे. तो माझ्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. म्हणून मी त्याला त्रास देत नाही. यामुळे माझा संघर्ष, मेहनत ही कमकुवत होत जाते,” असेही झरीन खान म्हणाली.

 

महत्वाच्या बातम्या: 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!