Share

‘त्या’ घटनेवरून चित्रा वाघ यांनी साधला शंभूराजे देसाईंवर निशाणा; “स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे. तर या घटनेचा आता सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

साता-यात पळसेवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहीजे. शंभूराजे देसाई तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार? असा सवाल करत चित्रा वाघ यांनी थेट शंभूराजे देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वनरक्षक सानप यांना मारहाण केली आहे.महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्यात धक्कादायक म्हणजे ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सातारा पोलिसांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत. असे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!