🕒 1 min read
मुंबई: गोवा विधानसभा (Goa Assembly elections) निवडणुकींसाठी भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपची ही १९ जानेवारीलाच जाहीर करण्यात येणार होती. मात्र काही जागांचा तिढा न सुटल्याने यादी आज जाहीर करण्यात आली आहे. अयात मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant), उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर, चंद्रकांत कवळेकर यांच्यासह इतर नावांची घोषणा केली आहे.
मात्र या यादीत भाजपची ‘वन फॅमिली-वन तिकीट’ ही घोषणा हवेतच विरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण याच यादीत भाजपने राणे दाम्पत्य आणि मोन्सेरात दाम्पत्याला तिकीट जाहीर केले आहे. यानुसार भाजपने वाळपई मतदारसंघातून विश्वजीत प्रतापसिंग राणे यांना तर पर्ये मतदारसंघातून त्यांची पत्नी दिव्या विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांना तिकीट दिले आहे. त्याचसोबतच पणजीतून बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) आणि ताळगावमधून त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे भाजपने घराणेशाहीला समर्थन दिल्याचे यातून दिसून येते आहे.
दरम्यान भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला समर्थन दिले आहे. विश्वजीत राणे यापुर्वीच भाजपचे आमदार होते. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत वाळपई मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता. तर पर्ये हा मतदारसंघ काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांचा होता. आम्ही त्यांना काँग्रेसच्या उतरत्या आलेखाविषयी सांगून भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच मोन्सेरात दाम्पत्य यापुर्वी पासूनच विधानसभेवर होते. त्यामुळे दोघांनाही त्यांच्या सिटींग जागेवरूनच उमेदवारी देण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास आमचा पाठींबा”,संजय राऊतांचा मोठा दावा
- किलेअर्क परिसरातील ‘ती’ घरे जमिनदोस्त; डोळ्यासमोर घरं उध्वस्त होतांना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू!
- कॉंग्रेसची ‘पोस्टर गर्ल’ भाजपच्या वाटेवर; प्रियांका मौर्य यांचा कॉंग्रेसला धक्का
- ज्या बापाने आयुष्यभर मुलींना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले त्या लेकींनी बापाच्या अखेरच्या प्रवासात दिली साथ!
- राणीच्या बागेत १०६ कोटींचा घोटाळा; भाजप आमदार कोटेचा यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
