पुणे : राज ठाकरे नाही तर उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवले. पुण्यात एका कार्यक्रमात आठवले आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे आठवले म्हणाले की, “आज बाळासाहेब असते तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत जाऊ दिले नसते. अडीच – अडीच वर्षाच्या फॉर्म्युलाचा विचार करून उद्धव यांनी भाजपसोबत यावे. त्यासाठीची अजूनही वेळ गेलेली नाही.” असे आवाहन आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना केले.
मशिदीवरील भोंग्याबाबत त्यांचे मत विचारल्यानंतर ते म्हणाले, “राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेशी मी सहमत नाही. विरोधाला विरोध योग्य नाही.”
महत्त्वाच्या बातम्या :
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संजय राठोडांना हवंय पुन्हा मंत्रिपद
पाकिस्तानच्या रस्त्यांवर ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा!
यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर…”
“शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं म्हणजे…”, यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ वक्तव्याला शिवसेनेचे प्रत्युत्तर
“सोमय्यांच्या देशविरोधी कृत्यात भागीदार होऊ नका, अन्यथा राजभवनाची इभ्रत जाईल”; संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

