नवी दिल्ली- केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ एल मुरुगन यांची मध्य प्रदेशमधून तर केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची आसाममधून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची निवड झाल्याचं आज घोषित करण्यात आलं. कॉंग्रेसनं आपला उमेदवार उभा न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली.
महाराष्ट्रातून कॉंग्रेसच्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रजनी पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. कॉंग्रेसचे राजीव सातव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
पश्चिम बंगालमधून तृणमूल कॉंग्रेसच्या सुष्मिता देव यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. इतर कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. तामिळनाडूमधून डीएमके पक्षाचे डॉ. कनीमोळी, एन. व्ही. एन. सोमू आणि के. आर. एन. राजेशकुमार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. तर पुदुचेरीमधून राज्यसभेच्या एका जागेवर भारतीय जनता पार्टीचे एस. सेल्वगनाबाथी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारची ‘स्मार्टफोन’ योजना
- बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकीसह अतिवृष्टीग्रस्त भागात राणाजगजितसिंह यांचा पायी दौरा
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

