Share

माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई:- मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आवाहन असणार आहे.

दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हातात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पहिल्याच दिवशी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात असं कॅप्टन म्हणून माझं मत असल्याचं भाई जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, एका बाजूला आघाडीतील काही नेते सर्व निवडणुका एकत्र लढवू असं सांगत आहेत तर काही नेते स्वबळाची भाषा करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र यावे ही तर आमची इच्छा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

मुंबईत बोलताना फडणवीस म्हणाले,’काही निवडणुकांमध्ये इकडे तिकडे झाले म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्याला संधी दिली आहे, जी काही पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे ती जागा भरुन काढू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!