🕒 1 min read
मुंबई : नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
नाशिकमध्ये भाजपचे माजी आमदार आणि शहर अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब सानप यांनी आज भाजपच्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घरवापसी केली. बाळासाहेब सानप यांनी याआधी विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत भाजपला रामराम ठोकला होता. ”गेले अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे काम केलेल्या माणसाला दुसरीकडे गेल्यावर चुकल्यासारखे वाटते हीच अवस्था माझीही झाली होती. पण स्वतः देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले की आता दुसरीकडे कुठेही जायच नाही. त्यामुळेच मी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला,” असे बाळासाहेब सानप यांनी भाजप प्रवेशानंतर स्पष्ट केले.
भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला. मधल्या काळात थोडासा दुरावा झाला पण संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे. येत्या काळात नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपकडून जास्तीत जास्त काम करेन, अशा शब्दात बाळासाहेब सानप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महत्वाच्या बातम्या
- गुलाबराव पाटलांचा मतदारसंघ तहानलेला; धरणगाव ग्रामस्थांनी काढला नगरपालिकेवर हंडा मोर्चा
- मतदारसंघातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा निधी देणार- देवेंद्र भुयार
- राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करणारेही रामभक्त व देणारेही रामभक्तच असतील : शौमिका महाडिक
- भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालकेंची बिनविरोध निवड
- ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवरच कोसळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
