🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारीही पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आढावा घेतला. राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री काल उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते .यावेळी पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला.
परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार काय? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या २ दिवसांत अनेक नेत्यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे.शेतकऱ्यांचा रोष वाढला असून मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष बांधावर शेतीचं झालेलं नुकसान बघावं आणि लवकरात लवकर नुकसान भरपाईची तरतूद करावी अशी उद्विग्न मागणी केली जात आहे.
अशातच, सरकार दरबारी निधीचा तुटवडा असून केंद्राने थकीत देणी लवकर द्यावी, तसेच पॅकेज जाहीर करावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सत्तेतील नेत्यांनी सांगितलं. याच मुद्द्यावरून भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरील खर्चाला लक्ष्य केलं आहे. ‘मुख्यमंत्र्यानी सोलापूर मध्ये अक्कलकोट भागाची पाहणी केली तिथून विमानाने मुंबईला निघाले, दुसऱ्या दिवशी विमानाने कटगाव ला आले, सोलापूर ते कटगाव ३३ किलोमीटरवर आहे. १ रात्र राहून दौरा करता आला असता पण शेतकऱ्यांसाठी नाही तर मुख्यमंत्र्याचा विमानाचा खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत.’ अशी टीका त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यानी सोलापूर मध्ये अक्कलकोट भागाची पाहणी केली तिथून विमानाने मुंबईला निघाले, दुसऱ्या दिवशी विमानाने कटगाव ला आले, सोलापूर ते कटगाव ३३ किलोमीटरवर आहे. १ रात्र राहून दौरा करता आला असता पण शेतकऱ्यांसाठी नाही तर मुख्यमंत्र्याचा विमानाचा खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत. pic.twitter.com/QgIcgwUNTq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 22, 2020
महत्वाच्या बातम्या-
- ‘महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर येतील, म्हणून सीबीआयला प्रवेश बंदी’
- शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा होणार खंडित !
- शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा
- ‘खडसेंना राष्ट्रवादी पक्षाची भूमिका पटली असेल तर त्यांचे स्वागतच करावे लागेल’
- ‘महाराष्ट्र सरकार’चा CBIला जोरदार धक्का; घेतला ‘हा’ खूप मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
