अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : परतीच्या पावसाने अहमदनगरला झोडून काढल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे साठवलेले अन्नधान्य भिजले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. पालकमंत्री या नात्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आज नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांचा आहे. त्यामुळे पाहणी, पंचनामे, मदत पुरेशी मिळेल का? जिल्ह्यात इतर तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री केवळ दोनच ठिकाणी पाहणी करणार असल्याने इतर तालुक्यांनाही नुकसान भरपाई मिळेल का? अशी शंका शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राजकीय नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षातील नेतेही परिस्थितीची पाहणी करण्यास उतरले आहेत. त्यामुळे पालकमंत्री मुश्रीफ आज सकाळी शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील भालगाव व बोधेगाव येथे पिकाच्या नुकसानीची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी नगरला येऊन अतिवृष्टी आढावा व कोरोना आढावा घेतील. त्यानंतर पक्षातील पदाधिकारी व नेत्यांशी चर्चा करतील. दिवसभराच्या दौऱ्यात ते केवळ दोन गावात नुकसान पाहणी करतील.
आमदार राजळे ह्या भाजपच्या आमदार आहेत विरोधकांच्या मतदारसंघात पालकमंत्री भरघोस मदत देतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. केवळ पाहणी करून अहवाल देऊ नये, तर पालकमंत्र्यांनी तेथेच मदत जाहीर करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी ; ३० लाख कर्मचाऱ्यांना ३,७३७ कोटी रुपयांचा बोनस
- धडाकेबाज अजितदादा क्वारंटाईन ; प्राथमिक लक्षणं दिसल्याने घेतला निर्णय !
- भाजपमध्ये गेलेले तसेच काठावरचे अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील – मुश्रीफ
- नाथाभाऊ करणार दसऱ्याच्या आधीच सीमोल्लंघन , राष्ट्रवादीचा आनंद गगनात मावेना
- राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी : देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

