Share

केजरीवालांना थोडी जरी लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा- गौतम गंभीर

Published On: 

नवी दिल्ली- दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . गेल्या 24 तासांत राजधानीमध्ये 28 हजार 395 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत 277 लोकांचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

दिल्लीत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखणे हे केजरीवाल यांच्यासमोर मोठे आव्हान बनले असून . अरविंद केजरीवाल राजधानीच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावाविषयी सातत्याने बोलत आहेत. ते सतत केंद्र सरकारकडून मदतीसाठी आवाहन करत आहेत.

वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. यातच  मंगळवारी सीएम केजरीवाल यांनी ट्विट केले होते की दिल्लीत काही तास पुरेल एवढाच ऑक्सिजन बाकी आहे. केजरीवाल यांच्या या ट्विटनंतर देशाच्या राजधानीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर आज पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी सीएम केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘व्हिजन नाही, दिशा नाही. दिल्ली मरत आहे. तुम्हाला लाज वाटत असेल तर राजीनामा द्या. ‘असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!