🕒 1 min read
नांदेड – राज्यात वाढता कोरोना कहर लक्षात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, शेतकरी नेते आ.सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
पांडुरंग शिंदे यांनी प्रमुख मागणी केली की, कोरोनामुळे कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाला शासनाने ₹ ५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी व सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मेडिक्लेम सर्वसामान्य जनतेचा लागू करावा, कोविड १९ आजाराच्या उपचारासाठी खाजगी दवाखान्यात जो खर्च झाला तो सरकारने द्यावा कारण वर्षांपासून कमी जास्त प्रमाणात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी, मजूर, कामगार इत्यादी वर्ग आर्थिक डबघाईला आला आहे,यांना मदत करणे व आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
या निवेदनात पुढे असे म्हणण्यात आले आहे की, राज्यात कोरोना महामारीचे प्रमाण वाढले आहे.कोविड 19 या आजाराने समाजातील सर्व घटक कमी -जास्त प्रमाणात बाधित झाला आहे.या आजाराच्या भीतीने जनता त्रस्त आहे अन यावर लॉकडाऊन करून प्रशासन दहशत निर्माण करून व आपले अपयश लपवत आहे.यावेळी विनोद वंजारे (जिल्हा अध्यक्ष, रयत क्रांती संघटना) बालाजी पांचाळ, बालाजी गिरी ,बाबाराव गोडबोले, शिवराम ठाकूर ,सुनील पंडित, अविनाश ढवळे ,साहेब नांदेडकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
रयत क्रांती संघटनेने केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे – १) कोरोना आजारामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांला ५ लाख रुपये मदत जाहीर करा. २)रेमेडीसिविर इंजेक्शनाचा काळा बाजार थांबवा व हे इंजेक्शन मोफत द्या. ३)ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या. ४)खाजगी दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकाची होणारी लूट थांबावा. ५)सरकारी नोकरदारा प्रमाणे सामान्य जनतेला दवाखान्यात खर्च शासनाने द्यावे.(मेडिक्लेम लागू करा).६) लॉक डाऊन हटवून जीवनमान सामान्य करावे.
महत्वाच्या बातम्या
- कठीण काळात मदतीला धावून आले अंबानी, 700 टन ऑक्सिजनचा करणार मोफत पुरवठा
- राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, काँग्रेसच्या आमदाराचे मोदींना पत्र
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
- मुंबई इंडियन्सला पुन्हा भोवले फलंदाजाचे अपयश; दिल्लीपुढे ठेवले माफक आव्हान
- सामना सुरु असताना पोलार्डने धवनला दिली ‘मांकडिंग’ चेतावणी; व्हिडिओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
