🕒 1 min read
चंद्रपूर – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात आजपासून जनता कर्फ्यु लावण्यात आला असून या आदेशाचे पालन न करणाऱ्या नागरिकांना शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
या जनता कर्फ्यू अंतर्गत बुधवार ते रविवार सर्व किराणा दुकान, भाजीपाला-फळ विक्री, चहा आणि नाश्ता दुकानं देखील बंद राहणार आहेत. सध्या राज्यभर सुरु असलेल्या ‘ब्रेक द चेन’ चा अपेक्षित परिणाम चंद्रपूर जिल्ह्यात होत नसल्याने हा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
अनेक लोक किराणा आणि भाजीपाला घेण्याच्या नावाने घराबाहेर पडत असल्याचा आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील व्यापारी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांसोबत एक बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने हा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द
- राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावा, काँग्रेसच्या आमदाराचे मोदींना पत्र
- ‘नवाब भाई… राष्ट्रवादीच्या आमदारांनीही रेमडीसीवरचा पुरवठा केला,हा औषधांचा साठा कुठून आला?’
- शरद पवार पुन्हा रुग्णालयात,शस्त्रक्रियेनंतर आता प्रकृती स्थिर
- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर करा – रयत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
