Share

भोरमधील तीनशे वर्षांची परंपरा खंडीत, श्रीराम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द

Published On: 

पुणे – आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमी… देशभरात हा राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या राम नवमीच्या उत्सवावरही कोरोनाचं सावट आहे.

भोर तालुक्यातील तीनशे वर्षाची परंपरा असलेली प्रसिद्ध राम जन्मोत्सवाची परंपरा या ही वर्षी खंडीत करण्यात आली आहे. रामनमवी आणि जनाईदेवीची यात्रा असा मोठा उत्सव भोर मध्ये भरत असतो मात्र कोरोना महामारीचे संकट असल्याने राम जन्मोत्सव सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे.

या यात्रांचे आकर्षण असलेल्या पंतसचिव राजे यांच्या वाड्यात आकर्षित सजावट करून राम जन्मोत्सव साजरा केला जात असतो,मात्र यंदा संपूर्ण परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे नागरिकांनी घरा बाहेर पडू नये तर घरूनच निवेद्य आणि दर्शन घ्या असे आवाहन ही श्रीमंत राजेश राजे पंतसचिव आणि भोर प्रशासन यांनी केले आहे.

दरम्यान, देशासह राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दररोज कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच आज साजऱ्या केल्या जाणाऱ्या राम नवमी उत्सवासाठीही शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचं पालन करत कोरोनाच्या सावटात राज्यभरात ठिकठिकाणी राम नवमीचा उत्सव पार पडत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!