नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तसेच पाकिस्तानने भारतावर वेळो-वेळी केलेल्या कुरापती ह्या संपूर्ण जगाला माहिती आहेत. २०१४ नंतर मोदी सरकार भारतामध्ये सत्तेत आल्यानंतर ज्या-ज्या वेळी पाकिस्तानने भारतावर कुरापती केल्या त्या-त्या वेळी भारताकडून पाकिस्तानला चोख उत्तर मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान सरकारचा चांगलाच संताप झाला होता. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापार संबंध तोडले, बस सेवा, रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील होताना दिसत होते.
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातवरण तयार झालं होत. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी भारतात जोर धरु लागली होती. मात्र पाकिस्तानवर हल्ला केल्यास आम्हीही जोरदार प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी इम्रान खान यांनी दिली होती. पण अशा कोणत्याही धमक्यांना न घाबरता भारताने air strike करून पाकिस्तानला चोख उत्तर देखील दिले होते.
सतत वेगवेगळ्या पद्धतीने भारतावर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला सध्या भारताच्या मदतीची गरज आहे. कोरोनामुळे भले भले देश डबघाईला आले. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानला सध्या भारताकडे कोरोना लसीची मागणी करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर माणुसकीच्या दृष्टीने भारताने पाकिस्तानला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे.
जगातील अनेक देशांनी भारताकडे कोरोना लसींची मागणी केली आहे. पाकिस्तानेदेखील भारतात तयार होणारी कोरोना लस मागवली आहे. पाकिस्तानला भारतीय लस स्वस्त पडेल. इतर देशांकडून कोरोना लस घेतल्यास पाकिस्तानला त्यावर अधिक खर्च करावा लागेल. कोरोना लसीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या कराराच्या माध्यमातून मिळेल. पाकिस्तानसोबतच इतरही अनेक देशांना भारत कोरोनावरील लस देणार आहे.लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- हा अर्थसंकल्प काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी- बाळासाहेब थोरात
- ‘सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प’
- असे चांगले अर्थसंकल्प कमीच पाहायला मिळतात; मोदींनी मानले सीतारामन यांचे आभार
- ‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं’
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला

