Share

‘बजेटच्या हृदयात गाव आणि शेतकऱ्यांचा विकास आहे’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधक टीका करत असतानाच भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला संबोधित करून अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे. सुरुवातीला मोदींनी सीतारामन यांचे आभार देखील मानले आहेत. तर, ‘असे चांगले अर्थसंकल्प कमीच पाहायला मिळतात,’ असे कौतुकाचे उद्गार देखील त्यांनी काढले. ‘या बजेटच्या हृदयात गाव आणि शेतकऱ्यांचा विकास आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना यापुढं अधिक सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकणार आहे. एपीएमसी मार्केटना आणखी बळकटी देण्यासाठीच्या तरतुदी करणयात आल्या आहेत.’ असं मोदी म्हणाले आहेत.

तर, ‘यंदाचा अर्थसंकल्प हा अडचणीच्या काळामध्ये सादर करण्यात आला आहे. कोरोना काळात जगभरात जे परिणाम पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण मानव प्रजातीलाच हादरा बसला. त्यामुळं या काळात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाता आत्मविश्वास वाढवणारा आहे.’ असं भाष्य देखील त्यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!