🕒 1 min read
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. कोरोनाच्या संकटातही मतदारसंघातील रस्त्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याअनुषंगाने मतदारसंघात रस्त्यांचे कामे प्रगतीपथावर सुरू आहेत. येत्या आर्थिक वर्षात मतदारसंघातील रस्ते विकासासाठी भरघोस निधीची तरतूद करून येत्या वर्षात मतदारसंघातील एकही रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.
तालुक्यातील लिहा, खेडी, मांडणा येथील विविध विकास कामांचे तसेच लिहा-खेडी ते मांडणा ते उंडणगाव रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी नामफलकाचे अनावरण व शेतकऱ्यांना मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबऱ्याचे वितरण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. प्रारंभी सत्तार यांनी लिहाखेडी, मांडणा ते उंडणगाव रस्त्यासाठी १ कोटी तर गावांतर्गत विकास कामांसाठी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार व्यक्त करीत गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रस्ते हे विकासाची संजीवनी आहे. मात्र अलीकडच्या काळात रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण हे रस्ते विकासासाठी मोठा अडथळा निर्माण करीत असल्याची खंत त्यांन व्यक्त केली. लिहा खेडी ते मांडणा रस्त्याचे काम लगेच सुरुवात होणार असून नागरिकांनी या रस्त्यावरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावेत, नसता रस्ता कामात अडथळा आणणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी प्रशासनास दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- नर्सिंग ‘एएनएम’ अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा; मराठवाड्यातील २० केंद्रावर बैठक व्यवस्था
- ‘ही नौटंकी असली तरी मोदींनी यांना कुठून कुठपर्यंत आणले आहे’, राणे यांची बोचरी टीका
- येऊ कशी तशी मी..’फेम अन्विताचा ट्रेंडिग गाण्यावरचा दिलखेच ‘ठूमका’
- शेतकऱ्यांची चेष्टा केल्याप्रकरणी मंत्रिमंडळातून वडेट्टीवार यांची हकालपट्टी करा- लोणीकर
- ‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
