Share

‘नको रे बाबा’, बायोबबल आणि विलगीकरणाला कंटाळले ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे. या कसोटी मालिकेतून कर्णधार विराट कोहली, केएल राहुल आणि हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं आहे. टीम इंडियाचे खेळाडू चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये एकूण 6 दिवस क्वारंटाईन राहणार आहेत.

करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून अनेक क्षेत्रांसह क्रीडा क्षेत्रालाही प्रचंड फटका बसला होता. आता यातून बाहेर पडत असताना विविध स्पर्धा सुरू झाल्या असल्या तरीही आता त्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या बायोबबल सुरक्षा व विलगीकरणाच्या नियमांना आता खेळाडू कंटाळले आहेत. स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे का नाही असा प्रश्‍न ते विचारत असून ही सुरक्षा व विलगीकरण आता नको रे बाबा अशीच मते विविध क्रीडापटूंनी व्यक्त केली आहेत.

भारतीय संघातील काही क्रिकेटपटूंनीच नव्हे तर ऑस्ट्रेलियाच्याही काही क्रिकेटपटूंनी या बायोबबल व विलगीकरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ऍरन फिंच यानेही करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विलगीकरणाच्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही अनेक खेळाडूंनी हा मुद्दा उठवल्यामुळे पुन्हा एकदा बायोबबल सुरक्षेबाबत क्रीडा क्षेत्रात नाराजी पसरली आहे.
करोनामुळे सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये बायोबबल सुरक्षा तसेच विलगीकरणाचे कठोर नियम आखण्यात आले. कुटुंबीयांपासून दूर राहण्याबरोबरच हॉटेलमध्ये एकाच खोलीत संपूर्ण दिवस घालवणे खेळाडूंना अशक्‍य होत असल्याने अनेक क्रीडापटूंनी याविषयी नाराजी दर्शवतानाच तक्रारही नोंदवली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!