Share

कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये कोणत्याचं खेळाडूची जागा सुरक्षित नाही : मोहम्मद कैफ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला. गेल्या चार वर्षांत टीम इंडिया आयसीसीचे विजेतेपद गमावण्याची ही तिसरी वेळ आहे. तत्पूर्वी, २०१७ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून त्यांचा पराभव झाला होता. २०१९ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा  विश्वविजेतेपदाचे स्वप्न भंग केलं आहे.

विराट कोहली हा कदाचित भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार असेल, पण त्याच्याकडे एकही आयसीसी ट्रॉफी नाही. आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरलेल्या विराटच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यानेही विराटच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्याने विराटच्या कॅप्टनसीवर काही आरोपही केले आहेत.

विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीममध्ये निवड कशी होते हे साफ नाही. तसेच खेळाडूंच्या मागील कामगिरीला प्राधान्य दिले जात नाही, असा दावा कैफनं यावेळी केला आहे.

एका प्रसिद्ध वाहिनीशी बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला की, ‘टीम इंडियामध्ये सर्व काही स्पष्ट नाही हे मान्य करायला हवे. तसेच विराट कोहली सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंनाचं टीम निवडीमध्ये प्राधान्य देतो. त्यामुळेच सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संधी मिळाली. शिखर धवनला काही सामने बाहेर बसावं लागलं आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये कोणत्याही खेळाडूची टीममधील जागा सुरक्षित नाही. असा आरोप कैफनं कोहलीवर लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!