Share

आरएसएसबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जावेद अख्तरांना न्यायालयाचा दणका

Published On: 

मुंबई :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांची विचारसरणीदेखील तालिबानसारखीच असल्याचं वक्तव्य प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी जावेद अख्तर यांच्याविरोधात ठाण्यातील न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे. खटला दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवत पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुके आता  जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जावेद अख्तर काय म्हणाले होते?

ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट तालिबानचे समर्थन करतोय असंही जावेद अख्तर यांनी सांगितलं होत.

भाजपाची प्रतिक्रिया-

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत त्यांनी आपले विधान मागे घ्यावे असे म्हटले होते. ‘आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल’ असे भातखळकर यांनी म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!