Share

किरीट सोमय्यांचा कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडली नोटीस

Published On: 

मुंबई : भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आज पुन्हा एकदा कोल्हापूर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुरगुडमध्ये कार्यकर्त्यांना सोमय्यांच्या दौऱ्यावरुन पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतून निघण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय.

आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना आव्हन दिलं आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर, कोल्हापुरातील वातावरण तापलं असून सोमय्या यांना २० सप्टेंबर रोजी कोल्हापूरला न जाताच माघारी फिरायला लागलं होतं.

किरीट सोमय्या हे मुंबईहून निघाले आहेत. सोमय्या यांनी २० सप्टेंबर रोजी जाण्याचे जाहीर केले असता जिल्ह्यातील वाढत तणाव लक्षात घेता कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हाबंदीची नोटीस देत निर्बंध घातले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!