Share

सरकारने थापा मारणे बंद करावे; सायरस पूनावाला यांच्या मोदी सरकारला कानपिचक्या

Published On: 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही लसीकरणाचे वर्षाला ११० कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिन्याला १० कोटी लसींचे उत्पादन हि सोपी गोष्ट नाही. भारत सरकार वर्षअखेरीस लसीकरण पूर्ण होण्याचे आश्वासन देत आहे. त्यांनी अशा थापा मारणे बंद करावे अशी जोरदार टीका सायरस पुनावाला यांनी सरकावर केली आहे.आज पुण्यात डॉ. सायरस पूनावाला यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

मोदी सरकारने लस परदेशात पाठवायला बंदी घालून अतिशय वाईट गोष्ट केलीय. सिरम इन्स्टिट्यूट अनेक वर्षांपासून जगातील १७० देशांना लस पुरवते. पण आता त्यांना गरज असताना त्यांना लस देता येत नाही. या देशांनी लसीसाठी आधीच पैसै दिलेत. बील गेट्स फाउंडेशनने पाच हजार कोटी रुपये दिलेत. लसींची निर्यात सुरू केली पाहिजे. अनेक देशांनी आगाऊ पैसे दिले आहेत. त्यांना लसी पाठवायच्या आहेत. असेही ते म्हणाले आहेत.

अमेरिकेत आताही अनेकांना लागण होत आहे. कोरोना जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!