Share

‘हा फक्त माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न नसून करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न’

Published On: 

नवी दिल्ली-  दिल्लीतील नांगल येथील एका मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडित कुटुंबियांची कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यानंतर त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबतचा फोटो ट्वीट केला होता. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली होती. या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांसोबत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होत.

याच ट्वीटनंतर राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विटरकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गांधी यांच्याशिवाय आणखी काही कॉंग्रेस नेत्यांच्या देखील अकाऊंटसवर कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवर निशाणा साधला आहे. एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे.

एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा राहुल गांधींवर हल्ला नाही. हा फक्त माझा आवाज बंद करण्यापुरते नाही तर लाखो आणि करोडो लोकांना गप्प करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, ट्विटर खाते बंद करून एका कंपनीने राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. व्यवसाय करणारी कंपनी राजकारण करण्याचे ठरवत आहे. एक राजकारणी म्हणून मला अशा गोष्टी आवडत नाहीत. हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला आहे. हा केवळ राहुल गांधींवर हल्ला नाही. हे फक्त राहुल गांधींना गप्प करण्याबद्दल नाही. माझे जवळजवळ १९ ते २० दशलक्ष फॉलोअर्स होते आणि तुम्ही त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखत आहात.

हे तुम्ही काय करत आहात? ट्विटरने या कृतीने हे सिद्ध केले आहे की न्यूट्रल प्लॅटफॉर्म नाही. गुंतवणूकदारांसाठी ही एक धोकादायक गोष्ट आहे कारण राजकीय स्पर्धेत कोणाची बाजू घेतल्यास ट्विटरसाठी वाईट परिणाम होऊ शकतात, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!