पुणे : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी पहिल्यांदाच जुन्नर-आंबेगाव दौऱ्यावर आले होते. पवारांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाला कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लोकांनीही तुफान गर्दी केली होती. तसेच पुणे जिल्ह्यातील मंचर येथे स्वर्गीय खासदार किसनराव बाणखेले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यावर ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? असा सवाल ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाही तर शरद पवारांना अटक करा, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिला आहे.
‘शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांनी कोरोना नियम तोडत जुन्नर-आंबेगाव पुणे येथे गर्दी जमून ज्याप्रकारे सभा केली. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल २१ इतरांच्या जीवनाचा अधिकार त्यावर गदा येते आणि इतर लोक ह्या मुळे संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे ही गर्दी जमणाऱ्यांविरुद्ध म्हणजेच शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी’, अशी मागणी करणारे पत्र वकील सदावर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.
गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?
‘शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाचे नियम नाहीत का? आणि कोरोनाचे नियम तोडल्यामुळे पुण्यात भरभरून गर्दी करून लोकप्रतिमा तयार करून केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी लोकांना एकत्र आणणे आणि इतर लोकांना वेठीस पकडणे हे भारतीय संविधानाच्या आर्टिकल २१ ला हे अभिप्रेत नाही. शरद पवार कायद्यापेक्षा मोठे नाहीत. दिलीप वळसे पाटील तुम्ही मंत्री आहेत. परंतु तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही. सामान्यांनी जर विवाहासाठी जास्त लोकं जमवले, तर तिथे धाड पडते.
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील हे तुफान गर्दी जमवतात. माध्यमांत बातम्या येतात. इथे धाड टाकण्यासाठी अधिकाऱ्यांना हातात बेड्या पडल्या आहेत का? शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर कारवाई करा. अन्यथा तुम्हाला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला थांबवता येणार नाही आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता माझा तुम्हाला स्पष्ट प्रश्न आहे.
कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. सामान्यपणे ७ वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसणाऱ्यांना अटक करून तुम्ही शूरता दाखवता. शरद पवारांना अटक करायला तुमच्याकडे शूरता नाही का? अटक करावी लागेल आणि अटक जर नाही केली तर आम्ही या सर्व बाबी आम्ही कारवाई नाही झाली म्हणून, FIR नाही झाला म्हणून मुंबई उच्च न्यायालयासमोर आणि राज्यपालांसमोर ठेवू’ असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्हिडिओ संदेशातून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर अजित पवार आणि अनिल परबांविरोधात देखील सीबीआय लागेल’; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ब्राह्मण हे विदेशी आहेत, असं वक्तव्य केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

