Share

‘शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही’

Published On: 

परभणी : कोरोना, लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झालेय. त्यामुळे आजघडीला शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून आधार देणे आवश्यक आहे. ते तत्काळ वाटप करण्यात यावे. यात शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा भाजप आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी दिला आहे.

सेलू तालुक्यातील पीक कर्जासह विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. पीक कर्जासाठी गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी शेतकरी वर्गास त्रास होवू नये या उद्देशाने या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बोर्डीकर म्हणाल्या की, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शेतकरी राजा आगोदर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सातबारा आणि इतर कागदपत्रांसाठी जेरीस आणू नका. त्यांना वेळेत पीक कर्ज द्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही पीक कर्ज सुलभ पद्धतीने वाटप करण्याबाबत संबंधीतांना सूचना देण्यात आल्या.

नूतन महाविद्यालयात खरिप पीक कर्ज आढावा बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, तहसीलदार मांडवगडे आदींसह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!