भोपाळ: गेल्या वर्षभरात देशात अनेक बँकांचे गैरव्यवहार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयने या बँकांच्या कामकाजावर नियंत्रण देखील आणले आहे. मात्र यामध्ये देखील सीबीआयने देखील देशातील 11 राज्यातील 100 हून अधिक ठिकाणी छापे मारले आहेत.
यामध्ये आयओबी, यूबीआय, बँक ऑफ बडोदा, पीएनबी, एसबीआय, आयडीबीआय, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या मोठ्या बँकांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणात सीबीआयने कानपूर, गाझियाबाद, मथुरा, नोएडा, दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरु, त्रिपुरा, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, अहमदाबाद, सूरत या ठिकाणी छापे मारले आहेत.
दरम्यान आता मध्य प्रदेशातील भोपाळमधील दोन बँकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्योति पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड आणि सिद्ध पाल सिंह भदौरिया यांच्या कंपनी या दोन कंपन्यांनी हि फसवणूक केल्या असल्याने सीबीआयने दोन कंपन्यांवर छापे मारले.
ज्योति पॉवर कॉरपोरेशन लिमिटेड या कंपनीने बनावट दस्तावेजच्या आधारे बँक ऑफ बडोदामधून 196 कोटींचं कर्ज घेतलं होतं. संचालक कमलेश आणि संजय नेमानी यांनी 196 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. तर दूसरीकडे सिद्ध पाल सिंह भदौरिया यांच्या कंपनीने प्रॉपर्टीचे बनावट दस्ताऐवज सादर करत इंडियन ओव्हरसीज बँकेची 4 कोटींची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या दोन्ही प्रकरणात सीबीआयने अहमदाबादमधील 4 तर राजकोटमधील एका ठिकाणी छापा मारला आहे. तर सिद्ध सिंह यांच्या भोपाळ आणि निवाडीतील निवासस्थानाची झाडाझडती घेतली. या प्रकरणात बँकेचे मॅनेजर सतीश चंद्र अग्रवालही सीबीआयच्या रडारवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !


