Share

नाना पटोले काहीही बोलले तरी महाविकास आघाडीला धोका नाही – अजित पवार

Published On: 

पुणे : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,’ असा टोला पटोलेंनी लगावला होता.

दरम्यान, अजित पवार आईनी पुणे जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पटोलेंना चिमटा काढला आहे. पटोलेंच्या सातत्याच्या विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये तणाव वाढत आहे का ? असा सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला असता, ‘नाना पटोले यांनी कोणतीही विधाने केली, तरी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे. त्यामुळे आघाडी सरकारला कोणताही धोका नाही,’ असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या नाराजीनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दूर ठेवल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!