Share

‘स्वतःला जाणते नेते समजणारे महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : २०१९ मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर सत्तास्थापनेवरून सुमारे एक महिन्यांहून अधिक काळ राजकीय नाट्य रंगलं होतं. निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप हे एकत्रपणे महायुतीद्वारे लढले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी देखील आपली आघाडी कायम ठेवली होती.

मात्र, निकालानंतर शिवसेना व भाजपमध्ये सत्ता स्थापनेच्या वाटाघाटींवरून मतभेद झाले व शिवसेनेनं भाजपची साथ सोडली. यानंतर सत्तेचा पेच निर्माण झाला होता. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मिळून सत्तास्थापन करणार अशा हालचाली सुरु असतानाच अचानक भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामुळे सबंध महाराष्ट्र अवाक झाला होता.

त्यांचं हे सरकार काही तासांसाठीच मर्यादित राहिलं व आमदारांचा पाठींबा सिद्ध न झाल्याने ते पडलं. अद्यापही या सर्व घडामोडींमागील सूत्रधारांबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं. फडणवीसांवर अनेक आरोप देखील करण्यात आले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑफ द रेकॉर्ड’ एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

‘औटघटकेच्या सरकारचे सूत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार होते,’ असं विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं असून हा कार्यक्रम ऑफ रेकॉर्ड घेण्यात आला. याचं कोणताही रेकॉर्डिंग व प्रक्षेपण न करण्यात आल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

याच वक्तव्याच्या आधारे भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. ‘गद्दारी करून ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही,’ अशी टीका राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!