Share

गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही; राष्ट्रवादीची मोठी घोषणा

Published On: 

मुंबई – संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेने कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने घातलेले नियम स्वीकारले यामुळे अनेक संकटाना देखील जनतेला सामोरे जावे लागले असल्याचे पहायला मिळाले. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहेत.

तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली असून तसे कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाहीत ही पक्षाची भूमिका असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नका किंवा एखाद्या कार्यक्रमातून गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नका थोडे दिवस थांबा असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटमध्ये धरला आणि तशा सूचना तिन्ही पक्षांच्या  पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पाऊले टाकली पाहिजेत ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!