Share

‘मला मोदींनी ओबीसींचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली’; डॉ. कराडांचा रोख नेमका कोणाकडे?

Published On: 

परभणी : मराठवाड्यातील गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते अशी ओळख असलेले डॉ. भागवत कराड यांना थेट केंद्रीय मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. भाजपमधील ओबीसी नेतृत्त्व संपवण्यासाठीच डॉ. कराड यांना मंत्रीपद देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे. डॉ. कराड यांच्या जनआर्शिवाद यात्रेनिमित्त त्याचा प्रत्यय देखील येतोय. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी समाजाचा स्वतंत्र कार्यक्रम आखून कराड यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यात कराड यांनीच आपण ओबीसींचे नेतृत्त्व करायला तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपवर जेव्हा-जेव्हा नाराज होतात, तेव्हा-तेव्हा त्यांच्या ओबीसी नेतृत्त्वाचा उल्लेख होतो. मात्र, त्यांचे ओबीसी नेतृत्त्वच संपवण्यासाठी डॉ. कराड यांना मंत्रीपद दिले गेले आहे. डॉ. कराड यांच्या जनआर्शिवाद यात्रेतही तसेच चित्र दिसत आहे. त्याला कराड देखील आता दुजोरा देत आहेत. कराड यांनी यात्रेदरम्यान आपल्या भाषणातून ओबीसी नेतृत्त्वाचा उल्लेख करत, आता आपण ओबीसी नेते असल्याचा सरळ-सरळ दावाच केला आहे.

नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना कराड यांनी आपण मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राचे नेते असल्याचे म्हटले होते. त्या नंतर परभणी शहरात वंजारी समाजाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याला ओबीसींचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यात त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्वश्रृत आहेच.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!