नवी-दिल्ली : ‘काश्मीर एक वेगळा देश आहे, तसेच तो भारत आणि पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला आहे’. असे अत्यंत वादग्रस्त विधान पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी केले आहे. काश्मीर काश्मीरच्या लोकांचा आहे.” असा दावा माली यांनी फेसबुक पोस्ट करत केला आहे. माली यांच्या या पोस्टमुळे त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात टीकांचा वर्षाव होत आहे. यातच एका ट्विटच्या माध्यमातून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेस ला चांगलाच टोला मारला आहे.
भातखळकर यांनी सिद्धू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांची सर्वत्र व्हायरल झालेली बातमी ट्विट करत त्यावर ‘हा जोकर राहुल गांधींचा इतका खास का आहे, याचा उलगडा करणारी ही बातमी’ असे कॅप्शन देत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.
हा जोकर राहुल गांधींचा इतका खास का आहे, याचा उलगडा करणारी ही बातमी… pic.twitter.com/LhXEfkKi3w
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 19, 2021
दरम्यान, यासंदर्भात अद्यापही नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसून अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठिया,भाजप नेते विनीत जोशी तसेच मुख्यमंत्री अमरिंदर यांचे निकटवर्तीय राजकुमार वारका आदींनी माली यांच्या पोस्टवर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘पुण्यातील मंदिरातून मोदींची मूर्ती चोरीला’, राष्ट्रवादी पोलिसांत तक्रार देणार!
- धक्कादायक! नांदेडमध्ये मराठा आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- ‘उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघालेत’, नारायण राणेंची टीका
- ‘भुजबळांनी बाळासाहेबांना अटक केली, वाईट शब्द वापरले; ते आता शिवसेनेला गोड झाले, मग राणेंना विरोध का?’
- मोदींची मूर्ती हटवली! ‘आता समस्या कोण दूर करणार, नवसाला कोण पावणार?’ राष्ट्रवादीचा आंदोलनाद्वारे सवाल

