औरंगाबाद : कोकणातील पूरग्रस्तांना तब्बल १०० क्विंटल धान्य पाठवून धर्मरक्षक दहीहंडी महोत्सवाच्या वतीने यंदा मदतीची दहीहंडी फोडण्यात आली. जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवली.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संस्था, संघटना सरसावल्या असताना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यंदा दहीहंडी रक्षण महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला शिवसेनेच्या सर्व स्तरांतून जोरदार स्वागत करण्यात आले. राज्यात पुराने थैमान घातले आहे. पुरात अनेकांचे संसार बुडाले. दरड कोसळल्याने रस्ते, पूल, नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत पाठवण्यात येत आहे.
पावसाच्या व पुराच्या पाण्यामुळे असंख्य परिवार उघड्यावर आले आहेत. सध्या त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे होते. तरी अशा पूरग्रस्तांना हातभार लावण्यासाठी यासाठी येणाऱ्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय यंदा दहीहंडी आयोजन समिती तर्फे घेण्यात आला आहे. जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनाला झेंडी दाखवली या कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख अनिल कुलकर्णी मोहन मेघावे संदेश कवडे आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पैठण शहर व तालुक्यातील मनसेची कार्यकारणी बरखास्त
- ‘महाविकास आघाडीचे सरकार जाणार हे फडणवीसांचे दिवा स्वप्न’, बाळासाहेब थोरातांचा टोला
- ‘मोदी २०१४ लाच अफगाणिस्तानात का नाही गेले’, चाकणकरांचा खोचक सवाल
- ‘युतीमध्ये असताना भाजपाला पक्षविस्ताराला संधी मिळत नव्हती, आता भाजपाला विस्ताराची संधी’
- स्वाभिमानी शिक्षक संघटनेतर्फे ऑनलाइन कवीसंमेलनाचे आयोजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
