Share

पाकिस्तानचा लाळघोटेपणा!, म्हणे, ‘जगाने तालिबानचे स्वागत करावे’

Published On: 

इस्लामाबाद : अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेल्या गोंधळाच्या परिस्थितीत ‘अगोदरचे अफगाण सरकार तालिबानची बदनामी करत होते. हे आता चुकीचे ठरले आहे. कारण तालिबानींनी सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक माफी जाहीर केली आहे. असेच मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जाणार नाही अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.’ असे म्हणत तालिबानींच्या समर्थनार्थ असलेले विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केले आहे.

डॉन न्यूजच्या रिपोर्टनुसार, माध्यमांशी बोलतांना कुरैशी म्हणाले की, ‘तालिबान मुलींच्या शिक्षणावर बंदी घालेल अशी भीती होती पण असे झाले नाही. तालिबानने सार्वजनिकरित्या माफी जाहीर केली आहे. त्यांनी शाळा आणि व्यवसाय उघडणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणत्याही प्रकारे सूड घेणार नाही आणि आतापर्यंत जे काही केलं आहे ते शांततेनं केलं असून त्याचे स्वागत करायला हवे.’

दरम्यान, पुढे कुरैशी म्हणाले की , ‘पाकिस्तानविरोधात खोटा ट्रेंड सुरु झाला पण तो अयशस्वी ठरला. जगाला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये भ्रष्टाचारी व्यवस्था होती. सध्या जग अफगाणिस्तान प्रकरण सोडवण्यासाठी पाकिस्तानला एक जबाबदार देश समजून संपर्क करत आहे. आम्हाला अफगाणिस्तानात अशी व्यवस्था हवी आहे जी जगाला मान्य असेल.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!