महाड : शिवसेना नेते विकास गोगावले यांनी एक मोठे विधान केले आहे. “भाजप नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस हेच शिवसेनेचे मोठे शत्रू आहेत, ” असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे नेते विकास गोगावले यांनी केले आहे. महाड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेसच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गोगोवले यांनी हे विधान केले आहे. गोगावले म्हणाले, आमच्या महाड तालुक्यात भाजपची ताकत नगण्य आहे. इथे भाजप विजयी होऊ शकत नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेचा खरा शत्रू आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेने केलेल्या कामांचा श्रेय घेत आहे. आम्ही महाविकास आघाडी राहावी, ती टिकावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम करत आहेत.
आम्ही महाविकास आघाडी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीत बिघाडी करण्याचं काम करत आहेत. काँग्रेसचे चार माजी नगरसेवक आणि शिवसेनेचा एक नगरसेवक अशा पाच जणांचा मागील महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. जेव्हापासून यांचा प्रवेश झाला आहे, तेव्हा पासून शिवसेनेने केलेल्या कामांचं श्रेय हे लोक पळवत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :


