मुंबई : भारताचा दिग्गज सलामीवीर फलंदाज शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. प्लेऑफपूर्वी (Playoffs) आयपीएल २०२२ (IPL 2022)मधून बाहेर पडल्यानंतर धवनने त्याच्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर थैमान घालत आहे.
खरे तर, या व्हिडीओमध्ये त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणारा व्यक्ती त्याचे वडील आहेत. हा व्हिडिओ विनोदी पद्धतीने बनवण्यात आला असून चाहत्यांनाही तो प्रचंड आवडला आहे. शिखर धवन आयपीएलच्या या मोसमात पंजाबकडून खेळत होता. पंजाबचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही, पण धवनने पंजाबसाठी चांगली कामगिरी केली. त्याने १४ सामन्यात ३८च्या सरासरीने ४६० धावा केल्या. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
https://www.instagram.com/reel/Cd-yNasoskR/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading
शिखरच्या आयुष्यात जे काही चालले आहे, ते तो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असतो. धवनने शेअर केलेला व्हिडिओ हा निव्वळ गमतीचा भाग आहे. यामध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने अभिनय केला आहे. आयपीएलनंतर भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या होम सीरिजमध्ये शिखर धवनला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नाही. या गोष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्याला कर्णधार बनवले जाईल अशी चर्चा होती, मात्र केएल राहुलकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

