Share

Women’s T20 Challenge 2022 VEL vs TRL : स्मृती मंधानासाठी करो या मरो सामना; फायनलपासून व्हेलॉसिटी एक पाऊल दूर!

Published On: 

मुंबई : महिला टी-२० चॅलेंज (Women’s T20 Challenge 2022)स्पर्धेमध्ये गुरुवारी संध्याकाळी ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी (VEL vs TRL) यांच्यात सामना होणार आहे. व्हेलॉसिटीने गेल्या सामन्यात सुपरनोव्हासचा पराभव केला. अशा परिस्थितीत, हा सामना जिंकल्यावर, व्हेलॉसिटी फायनलमध्ये जाईल. तर ट्रेलब्लेझर्ससाठी करो किंवा मरो असा हा सामना आहे. शेवटच्या सामन्यात त्यांना सुपरनोव्हाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. अशा परिस्थितीत त्यांनी हा सामना चांगल्या धावगतीने जिंकल्यास ते अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहू शकतात. या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर अंतिम सामना व्हेलॉसिटी आणि सुपरनोव्हास यांच्यात होईल.

ट्रेलब्लेझर्सला गेल्या सामन्यात ४९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. एक सामना गमावल्यानंतरही सुपरनोव्हास रनरेटमध्ये आघाडीवर आहे. व्हेलॉसिटी दुसऱ्या स्थानी आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच म्हणता येईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला किमान १५० धावा करायच्या आहेत.

दोन्ही संघ –

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स, शर्मीन अख्तर, सोफिया डंकले, हेली मॅथ्यूज, सलमा खातून, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग.

व्हेलॉसिटी – दीप्ती शर्मा (कर्णधार), यास्तिका भाटिया, लॉरा वोल्वार्ट, शफाली वर्मा, नटकन चँथम, किरण नवगिरे, स्नेह राणा, सिमरन दिल बहादूर, अयाबोंगा खाका, केट क्रॉस, राधा यादव.

महत्त्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!