Share

न्यूझीलंडची दिग्गज क्रिकेटपटू एमी सॅदरवेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : न्यूझीलंड महिला संघाची क्रिकेटपटू एमी सॅदरवेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिचा २०२२-२३ हंगामासाठी केंद्रीय करारात समावेश करण्यात आला नाही. यानंतर तिने आता निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडकडून सर्वाधिक सामने खेळणारी एमी सॅदरवेट ही महिला क्रिकेटपटू आहे.

सॅदरवेटने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन दिवसांनंतर, तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पणही केले. पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात ती शून्यावर बाद झाली. असे असले तरी तिची कारकीर्द खूपच नेत्रदीपक होती. एमी सेदरवेटने १४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.३३ च्या सरासरीने आणि ७५.४४च्या स्ट्राइक रेटने ४६३९ धावा केल्या. तिने या फॉरमॅटमध्ये एकूण सात शतके झळकावली, त्यापैकी तिने सलग चार शतके झळकावली. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर ५० विकेट्सची नोंद आहे.

टी-२० कारकिर्दीत तिने या फॉरमॅटमध्ये १११ सामन्यांमध्ये २१.४९च्या सरासरीने १७८४ धावा केल्या. तिने टी-२० इंटरनॅशनलमध्‍ये गोलंदाजीचा मोठा विक्रमही केला. एमी सेदरवेटने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १७ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या. या फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडच्या कोणत्याही खेळाडूची ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!