महाविकास आघाडीचा न्यायालयावर विश्वास नाही – चंद्रकांत पाटील
आज इडीने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या मुंबई आणि पुण्यातील सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि दापोली येथे हे छापे टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांनी तपास यंत्रणांचा चुकीचा वापर होत असल्याची टीका भाजपवर केली आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.