🕒 1 min read
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.
बिहार निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपच्या मते जो फटका बिहारमध्ये काँग्रेसला बसला आहे, त्याचे परिणाम महाराष्ट्रात देखील उमटणार असून शिवसेनेला ते भोगावे लागतील. तर, शिवसेनेच्या मते भाजपच्या युतीचा हा निसटता विजय असून खरे विजयी तर तेजस्वी यादव आहेत.
राजद बिहारमधील मोठा पक्ष बनला असून भाजप केवळ एका जागेने मागे आहे. या निवडणुकीत नितीश कुमार यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या जागा या कमी झाल्या असून भाजप मोठा भाऊ बनला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून उलट-सुलट चर्चा होऊ लागल्या होत्या. निकालानंतर बहुमत मिळून देखील नितीशकुमार यांनी मौन धारण केल्याचं दिसून आलं होतं.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे दर्शवल्यानंतर, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यास राजी केले आहे. एवढेच नाही, तर ते पूर्वीप्रमाणेच स्वतंत्रपणे सरकार चालवू शकतील, असे आश्वासनही भाजप नेत्यांनी नितीश यांना दिले आहे. नितीश कुमार हे निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीमुळे नाराज आहेत.
भाजप नेते सुशील कुमार मोदी म्हणाले की नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार यात वादच नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री होतील असे आम्ही वचन दिले होते, या वचनावर आम्ही ठाम आहोत. कोणी जास्त जागा जिंकतं कोणी कमी, हे निवडणुकीत होत असतं. पण या सत्तेचे आम्ही समान भागीदार आहोत असे भाजपतर्फे वारंवार सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने अशीच तत्परता मराठा आरक्षणप्रश्नी दाखवावी – सचिन सावंत
- जेलमधून बाहेर पडताच अर्नबची दुसऱ्या जामिनासाठी पळापळ !
- ५००-१००० देऊन गर्दी जमावणाऱ्याने आम्हाला चॅलेंज देऊ नये; सचिन सावंतांचा अर्णबला टोला
- आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणूनच फडणवीस ‘हे सरकार पडणार’ असं सांगतात – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

