🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.
याबाबत महाराष्ट्र भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटरवर नितीन राऊत आणि कॉंग्रेस पक्षावर सडकून टीका केली आहे. याबद्दल उपहासात्मक ट्वीट केलं आहे. ज्यात एक व्यंगचित्र शेअर करण्यात आलं आहे. गुजरात निवडणूकीत राहुल गांधी हे जाणावेधारी ब्राम्हण असल्याच्या कॉंग्रेस नेत्यांच्या दाव्याचा संदर्भ आहे.
या फोटोला कॅपशनही हटके दिलं आहे. ‘महाराष्ट्राचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया…’. त्यामुळे नितीन राऊत याचं वक्तव्य इतरांप्रमाणे त्यांच्याच पक्षाध्यक्षाच्या बाबतीतही लागू होतं असा टोला भाजपने लगावला आहे.
महाराष्ट्राचे मंत्री @NitinRaut_INC यांच्या विधानावर काँग्रेस नेते @RahulGandhi यांची प्रतिक्रिया… pic.twitter.com/K6ZKmRkKWR
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 14, 2020
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ‘परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला अक्कल शिकवणार का?’ असा सवाल नेमका कुणाला उद्देशून विचारला आहे या बद्दल चर्चा सुरु आहे. कारण काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे जानवेधारी ‘कौल’ ब्राह्मण असल्याचे तसेच त्यांचे गोत्र दत्तात्रेय असल्याचे समोर आले होते. त्यामुळे काश्मिरी ब्राम्हण असलेल्या पंडीत नेहरूंच्या जानवेधारी दत्तात्रेय गोत्र असलेला पणतू राहुल गांधी यांना नितीन राऊतांनी घरचा आहेर दिला आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी हे अहिंदू आहेत व त्यांनी धर्मांतर केले आहे, असा प्रचार विरोधक करीत होते, पण त्यावेळी राहुल हे जानवेधारी ब्राह्मण असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले होते.आता राऊत हे राहुल गांधी यांची देखील अक्कल काढत आहेत का असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
