Share

Ramdas Kadam | “नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे…”; रामदास कदम

Published On: 

🕒 1 min read

दापोली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रामदास कदम यांचे वक्तव्य –

नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करुन बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते, असं म्हणत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणामधील रत्नागिरीत शिंदे गटाने रविवारी पहिला मेळावा घेतला.त्यावेळी शिंदे गटातील नेते रामदास कदम दापोली येथील सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत-

आमचे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुणटुण टुणटुण खोका, खोका करत उड्या मारत आहेत. आता हा म्हणतंय बोका आणि नाव घेतंय खोका, असं कदम यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, जे शिवसेना प्रमुखांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं.

तसेच, रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील, माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला असल्याचं कमदमांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!