Share

७ दिवसात नितेश राणेंनी माफी मागावी अन्यथा…; वरुण सरदेसाईंचं चोख प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : आज भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘मला दहावीत ९१ टक्के गुण आहेत, बारावीत देखील उच्च श्रेणीसह पास झालो आहे. मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. दोन वर्षात मिळणारी सिव्हिल डिग्री मी एका वर्षात पूर्ण केली आहे. अत्यंत साध्या व उच्च शिक्षित घराची मला पार्श्वभूमी आहे,’ असं सांगत त्यांनी सुरुवातीला आपली ओळख करून दिली.

पुढे त्यांनी राणे घराण्यावर खोचक टीका केली आहे. ‘राणेंच्या घराची पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना माहितच आहे. ते काँग्रेसमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी देखील राणेंवर गंभीर आरोप केले होते. धमकावणे, मारहाण करणे यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत,’ असं टीकास्त्र सरदेसाई यांनी सोडलं आहे.

‘मला राजकीय आवड असल्याने मी या क्षेत्रात आहे. मात्र, माझी राजकीय कारकीर्द संपावी या हेतूने केवळ हे घाणेरडे आरोप नितेश राणेंनी केले आहेत. ते सगळे आरोप तथ्यहीन आहेत. त्यामुळेच मी त्यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करणार आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. नाहीतर येत्या ७ दिवसात त्यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं,’ असा इशारा वरुण सरदेसाई यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी कोणते आरोप केले होते ?

‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’  अशी मागणी वाझे करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.

‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.

पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!