🕒 1 min read
जळगाव: भाजप नेते नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे सर्वांना पुरून उरतील तसेच ठाकरे आणि पवार ते खिशात घेऊन फिरतात. असे वक्तव्य केले होते. आता याचाच मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी समाचार घेतला आहे.
“निलेश राणे हे कोण आहेत? हे निलेश राणे म्हणजे आम्ही जन्माला घातलेलं पिल्लू आहे. ते काय आम्हाला शिकवणार?”, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी राणेंवर टीका केली आहे. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील वीज उपकेंद्राचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान नितेश राणेंच्या या वक्तव्याचाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, राज्यात राजकीय मतभेद असू शकतात. मात्र जी भाषा शरद पवार यांच्याबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरची आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच शरद पवार यांच्याबद्दल राणे पुत्र बोलतात हे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदी यांना मान्य आहे का? असा सवाल करत जर त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी बोलायला हवं. असं राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
भिवंडीत “काश्मिर फाईल्स” चित्रपट बंद केल्याच्या विरोधात भाजप आक्रमक
-
“असंसदीय शब्द बिनदिक्कतपणे वापरणाऱ्या संपादकांची…”, भातखळकरांचा हल्लाबोल
-
IND vs SL: आकाश चोप्राने केले ऋषभ पंतचे कौतुक म्हणाला “टेस्टमध्ये त्याने…”
-
“पराभवासाठी गांधी कुटुंब जबाबदार नाही”, मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया
-
“तपास यंत्रणांच्या टार्गेटवर शरद पवारांसह महाविकास आघाडीचे नेते” – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
