Share

Shivsena | शिवसेना नेमकी? कोणाची कोर्टाकडून सुनावणीची नवीन तारीख

Published On: 

मुंबई : शिवसेना पक्षाची सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाचे 5 न्यायाधीशांचे घटनापीठ देणार आहे. आता या प्रकरणाची पहिली सुनावणी घटनापीठ 29 ऑगस्टला (सोमवार) करू शकते.

शिवसेना कोणाची? कळणार ‘या’ तारखेला:

31 ऑगस्टला सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा हे निवृत्त होत आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवलं. अशा स्थितीत घटनापीठाकडून आज पहिल्यांदाच या प्रकरणावर सुनावणी होईल, अशी अपेक्षा होत. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्रमांमध्ये त्याचा उल्लेख न झाल्यामुळे ती होणार नाही.

या प्रकरणाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्याचे शिवसेनेच्या वकिलांनी यापूर्वी न्यायालयात नमूद केले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण टेबलवर सुनावणीसाठी नेलं. मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमण, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती कृष्णमुरारी यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी त्यावर सुनावणी केली आणि हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवले.

शिंदे गटाचा बंडः

शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करून एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुवाहाटीला गेले होते.बंडखोरपणा करुन सत्ता प्राप्त करणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर दावा केला गेला आहे. मात्र, धनुष्यबाण हे शिवसेनेचे मान्यताप्राप्त मतदान चिन्ह आहे. त्यामुळे याबाबत कोणताही आदेश देण्यापूर्वी किमान त्याची सुनावणी करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. यानंतर, शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात शिवसेनेने याचिका दाखल केली होती. या अपात्रतेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. अनेक वेळा याची सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी न झाल्यामुळे आज पुन्हा याचिका करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!