🕒 1 min read
मुंबई : कुपोषणाच्या मुद्द्यावर विरोधक आज चांगलेत आक्रमक झाले. आदिवासी विकास मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता.
तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही-
राज्यातील कुपोषित बालकांचा मृत्यू होत असताना आदिवासी विकास मंत्री योग्य उत्तर देत नाहीत. ते आरोग्य मंत्र्यांकडे प्रश्न ढकलत आहेत. मग आरोग्य मंत्र्यांकडे उत्तर असते तर त्यांनी उत्तर दिले असते. मात्र योग्य उत्तर सभागृहात दिले जात नाही तोपर्यंत आमचे समाधान होणार नाही, त्यामुळे हा प्रश्न राखून ठेवावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
दरम्यान, हा प्रश्न रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात येताच जयंत पाटील आक्रमक झाले आणि आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । आदित्य ठाकरे यांना डिवचणारे पोस्टर जेव्हा एकनाथ शिंदे वाचतात, तेव्हा…
- Shivsena | शिवसेना नेमकी? कोणाची कोर्टाकडून सुनावणीची नवीन तारीख
- Ajit Pawar | आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू व कुपोषणाच्या वास्तवाला सरकार मान्य करत नाही – अजित पवार
- Raj Thackeray | महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?- राज ठाकरे
- Jayant Patil। जयंत पाटलांकडून सभागृहात तुफान टोलेबाजी, शिंदे गटातील मंत्रिपदावरुन ओढले ताशेरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
