मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आपलं जीवन संपवलं होतं.
आता याचप्रकरणी अर्णब गोस्वामी याला अटक करण्यात आल्यानंतर अन्वय नाईकला तब्बल अडीच वर्षानंतर तरी न्याय मिळणार का? असा सवाल निर्माण होत आहे. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आपण हे पाऊल उचलत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी मृत्युपुर्वीच्या पत्रातून केला होता.
मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज अर्णब गोस्वामी याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णब गोस्वामी याला अलिबाग न्यायालयात हजर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये टीकेचं युद्ध सुरु झालं असून हे प्रकरण फक्त राजकीय कुंपणात न अडकता दोषींवर कडक कारवाई होऊनअन्वर नाईकला कायद्याच्या आधारे न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- ‘आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2’ ; नवाब मलिकांनी केली अर्णब गोस्वामीवर जहरी टीका
- महाराष्ट्रातील पप्पू सरकार कोणाकोणाचा आवाज दाबणार? ; कंगणाचा घणाघात
- लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

