🕒 1 min read
सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे ( BJP MLA Nitesh Rane) यांना संतोष परब हल्ला प्रकरणी काल (४ फेब्रुवारी) सिंधुदुर्ग न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना भेटायला कुणालाही परवानगी नाहीये. काल त्यांच्या वकिलाने कारागृह अधीक्षकांकडे प्रकृती अस्वस्थ असल्याने नितेश राणेंना रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची मागणी केली होती. त्यानुसार ते रुग्णालयात दाखल आहेत.
दरम्यान राणेंना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याविरोधात त्यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तर सुनावणीपूर्वीच प्रकृती अस्वस्थ असल्याने ते रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मी तुमच्या सारखा ए-क्लास नागरिक…”; ओवेसींची नवी मागणी
- “नको बापट, नको टिळक…”; पुण्यातील मध्यवर्ती भागातील बॅनरमुळे चर्चेला उधाण
- नागपूर-तुळजापूर महामार्गावर जाळपोळ
- Goa Election 2022 : गोव्यात महिलेची राहुल गांधीना मिठी
- अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध, प्रकरण गेलं कोर्टात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
