पुणे: १ फेब्रुवारी २०२१ मंगळवार रोजी पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेची यादी आणि त्याचे संबंधित नकाशे जाहीर झाले, तेव्हापासून सर्वच पक्षात गटबाजीला सुरुवात झाली आहे. याला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पण अपवाद ठरला नाहीये. कसबा मतदार संघात धीरज घाटे, मुक्ता टिळक आणि गिरीश बापट या तिघांच्यात नेहमीच जोरदार रस्सीखेच चालू असते. असाच काहीसा प्रकार सदाशिव पेठेतील नासि फडके चौकात घडला आहे. धीरज घाटे हे पर्वती भागातील दांडगा जनसंपर्क असलेले भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते आहेत.
त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीकरता कसबा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारून पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मुक्ता टिळक यांचे समर्थक आणि धीरज घाटे यांचे समर्थक समोरा समोर आले होते. असाच काहीसा प्रकार आता पुन्हा घडला आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील ना.सी.फडके चौकात पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक धीरज घाटे यांच्या समर्थकांनी ” गरज तिथे धीरज” असे बॅनर उभे केले आहेत.
त्याला उत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे विद्यामान लोकसभा खासदार गिरीश बापट आणि कसबा विधानसभेच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या समर्थकांनी धीरज ‘आम्हाला नाही तुझी गरज आता तू जा घरी परत’ असे बॅनर उभे केले आहेत. तर काही लोकांनी ‘नको बापट नको टिळक’ आता पुण्याला हवी नवीन ओळख असे बॅनर त्याच जागी उभे केले आहेत.
पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाल्यावर अनेक इच्छुक उमेदवारानी आपल्या प्रभागात बॅनरबाजी सुरु केली आहे. तर सद्यस्थितीला नगरसेवक असलेल्यानी आपण केलेल्या कामाचा आराखडा मांडणारे बॅनर लावले आहेत. केलेल्या विकासकामाची माहिती देण्यासाठी नगरसेवकांकडून सोशल मेडीयाचाही आधार घेतला जात आहे. त्यासाठी स्वतंत्र सोशल मीडिया टीमही अनेकांनी नेमली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Goa Election 2022 : गोव्यात महिलेची राहुल गांधीना मिठी
- अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाला करणी सेनेचा विरोध, प्रकरण गेलं कोर्टात
- पुण्यात झाली आज अचानक वाहतूक कोंडी
- उद्या पुण्यात संजय राऊतांचे उद्योग बाहेर आणणार – किरीट सोमय्या
- “पंकजा आणि सुप्रियाताई या दोन्ही नेत्या निर्व्यसनी”, बंडातात्यांनी मागितली माफी


